22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रदैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे

दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे

एकमत ऑनलाईन

मुंबई : दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांना संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यापूर्वी, खुद्द उद्धव ठाकरे मुखपत्राचे संपादक होते, पण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता त्यांनी पुन्हा ही जबाबदारी स्वीकारली आहे.

९० च्या दशकात आपले विचार, राजकीय भूमिका महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ मध्ये ‘सामना’ दैनिकाची सुरुवात केली होती. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांना पदाची जबाबदारी देण्यात आली.

त्यानंतर २०१९मध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करत २९ नोव्हेंबर २०१९ ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे यांनी ‘सामना’च्या संपादकपदाची धुरा पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवली. दरम्यान, राज्यात सत्तानाट्यानंतर कट्टर सेनानेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत भाजपसोबत जात नवे सरकार स्थापन केले.

सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांनी पुन्हा दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदाची धुरा हाती घेतली आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ‘सामना’चे कार्यकारी संपादक आहेत. अनेक वर्षांपासून ‘सामना’मधून शिवसेना राजकीय भूमिका, विचार प्रखरपणे मांडायची. यामधील लिहिले गेलेले अनेक लेख चर्चेचा विषयही बनले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या