24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeउद्धव ठाकरे देशातले पाचव्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे देशातले पाचव्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री

एकमत ऑनलाईन

सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यांमधले!

मुंबई | सी-व्होटर संस्थेने देशातल्या नेत्यांच्या लोकप्रियतेविषयीची एक पाहणी केली. यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहेत. या अहवालानुसार उद्धव ठाकरेंची लोकप्रियता 76.53% आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंची लोकप्रियता जास्त आहे.

राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यांमधले असल्याचं समोर आलं आहे.

Read More  जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाटचाल शतकाकडे

सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यांमधील आहे. तळाला असणाऱ्या पाच मुख्यमंत्र्यांपैकी एका राज्यातील सरकारक हे भाजपाच्या पाठिंब्यामुळे स्थापन झालेलं आहे. सर्वात कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये हरणायाचे मनोहर लाल खट्टर (४.४७ टक्के मते), उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (१७.७२) आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (४२.७९) या तीन भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

तळाच्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (३०.८२) आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (२७.५१) यांचा समावेश आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या