22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले; नवनीत राणांची घणाघाती टीका

उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले; नवनीत राणांची घणाघाती टीका

एकमत ऑनलाईन

अमरावती : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेवर सडकून केली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडले ते ऐकण्यासाठी लोक त्यांच्या सभेत आले होते, असेही राणा म्हणाल्या.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाल्या, एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढे नेऊ शकतात. उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडले आहे कारण सभेत उद्धव ठाकरे फक्त फिल्मचे डॉयलॉग सांगत होते, अशी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात, विचारांचे नाही, अडीच वर्षे उद्धव ठाकरे घरात बसले होते. त्यांनी फक्त फेसबुक लाईव्ह केले, अशी टीकाही त्यांनी केली

तर, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी दहा तोंडांचा ५० खोक्यांचा बकासुर म्हणत शिंदे सरकारवर घाणाघाती टीका केली आहे. या टीकेला भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देत उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलायला काही राहिले नसून भाजपाला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणतात मात्र ज्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मांडीवर जाऊन बसले. वेळप्रसंगी दोन मतांसाठी एमआयएमकडे गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाबाबत लोकांना कळले असून आता कितीही भावनिक होऊ शकता अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या