26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा सूर; मातोश्रीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा सूर; मातोश्रीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुखांनी हजेरी लावली होती. कुठल्याही प्रकारची नाराजी पदाधिका-यांमध्ये नसून जे गेले, त्यांच्यानंतर आणखी जोशाने जिल्हा प्रमुख कामाला लागले आहेत, अशी माहिती रायगड उपजिल्हाप्रमुख अवचित राऊत यांनी दिली. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या रुपातच मुख्यमंत्री बघायला आवडेल, असाही सूर बैठकीत निघाला.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याचं दिसत आहे. शिंदेंच्या पाठोपाठ अनेक महापालिकांमधील माजी नगरसेवकही त्यांच्या गटात सहभागी झाले. त्यानंतर मोठ्या संख्येने शिवसेना खासदारांनीही पक्षप्रमुखांवर भाजपशी जुळवून घेण्यासाठी दबाव आणल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर माजी आमदार, जिल्हाप्रमुख अशा पदाधिका-यांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे.

‘विधानसभेवर भगवा फडकवणार’
उद्धव ठाकरे यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. जे लालसेपोटी, आमिषाला बळी पडून गेले आहेत, त्यांच्यामुळे संघटनेला काही फरक पडणार नाही. त्यांच्या जागी नवीन नियुक्ती झाल्या आहेत. वर्षानुवर्षे जे काम करत आहेत, त्यांना संधी मिळाली आहे. जे गेले आहेत, त्यांच्यापेक्षा अधिक जोशाने काम करुन विधानसभेवर भगवा फडकवणार, असा विश्वास पदाधिका-यांनी बैठकीत व्यक्त केला.

‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत’
शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याला कोणीही वेगळं करू शकत नाहीत. जे बंडखोर आहेत, ते लोकांना आकर्षित करण्यासाठी अफवा पसरवत आहेत, ३६५ दिवस काम करणारा शिवसेनिक आहे, सहा महिन्यानंतर पण निवडणूक लागल्या तरी चालेल. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या रुपातच मुख्यमंत्री बघायला आवडेल, अशी इच्छा बैठकीत शिवसैनिकांनी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या