23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रगोरेगावात बुधवारी उद्धव ठाकरेंची तोफ गरजणार

गोरेगावात बुधवारी उद्धव ठाकरेंची तोफ गरजणार

एकमत ऑनलाईन

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतरची पहिली सभा, गटप्रमुखांच्या मेळाव्याकडे लक्ष
मुंबई : शिंदे गट आणि शिवसेना यांच्या वाद दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातील आरोपांपर्यंत असलेला वाद आता रस्त्यावरच्या लढाईत रुपांतरीत होताना दिसत आहे. अशातच आता शिवसेनेचा उद्या (बुधवारी) मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथे होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिवसैनिकांना मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पक्षाची आगामी भूमिका कशी असेल, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला अजून अधिकृत परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे राज्यातील राजकारणही तापले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. वेदांत आणि फॉक्सकॉनसारख्या मल्टी नॅशनल कॅपन्या राज्याबाहेर गेल्या. त्यावरूनही सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असे आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. सत्तांतरानंतर खरी शिवसेना कोणाची, हा प्रश्नं न्यायप्रविष्ठ आहे. अशा सर्व राजकीय प्रश्नांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवाजी पार्कवर कुणाला परवानगी?
दुसरीकडे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी कुणाला मिळणार, याचा पेच अजूनही कायम आहे. ठाकरे गटाकडून दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे, पण बीएमसीने याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. बीएमसीला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून अर्ज आले आहेत, या अर्जांबाबत २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या