21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंचे उरलेल्या १५ आमदारांना भावनिक पत्र

उद्धव ठाकरेंचे उरलेल्या १५ आमदारांना भावनिक पत्र

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल शिवसेनेच्या १५ आमदारांना धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना मोठ्या प्रमाणात फुटली. शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना वेळोवेळी आवाहन देखील केलं होतं. मात्र ४० पैकी एकही आमदार परतलेला नाही.

आता उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी त्यांच्यासोबत राहिलेल्या१५ निष्ठावान शिवसेना आमदारांनी भावनिक पत्र लिहीले आहे. या पत्रात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडचणीच्या आणि संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले आहेत.

पत्रात म्हटले आहे की, आईच्या दूधाशी बेईमानी करू नका हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहत निष्ठेचे पालन केले आहे. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलेत. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना असे पत्रात म्हटले आहे.

पत्रामध्ये म्हटले आहे, शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती आपल्याला बाळासाहेबांनी शिकवली आहे. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण निष्ठेचे पालन केले आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असल्याचं आपण दाखवून दिलंय, असे पत्रात म्हटले आहे.
आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात. आपल्या भूमिकेमुळं महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळालं आहे, असेही पत्रात म्हटलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या