19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeराष्ट्रीयउद्धव ठाकरेंची महाराष्ट्रात हिटलरशाही : नवनीत राणा

उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रात हिटलरशाही : नवनीत राणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी दिल्लीमध्ये आज (दि. ११) दुपारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा शरसंधान साधले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दशा झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नावावर मते मागितली, पण सत्ता मात्र दुस-यासोबत स्थापन केली. राज्यात बाळासाहेबांच्या विचारांची हत्या करण्यात आली आहे, अशी टीकाही रवी राणा यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला संकटापासून वाचविण्यासाठी हनुमान चालिसा म्हणण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. परंतु आमच्यावर चुकीच्या पध्दतीने कारवाई करण्यात आली. इंग्रजांच्या कायद्याचा वापर करून राजद्रोहाचे कलम लावण्यात आले. परंतु या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हा कायदा मोडून काढल्याबद्दल आम्ही स्वागत करतो. मुंबईचे पोलिस आयुक्त पांडे यांना आमिष दिल्याने आमच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोपही राणा यांनी यावेळी केला.

एका महिला खासदारावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. याबाबत आम्ही लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या