लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) लादलेल्या तीन वर्षांच्या बंदीविरुद्ध फलंदाज उमर अकमलने मंगळवारी अपील केले आहे. भ्रष्टाचार संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पीसीबीने उमरवर बंदी घातली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकमलने या बंदीविरोधात अपील केले असून येत्या १५ दिवसांत बोर्ड स्वतंत्र न्यायाधीश नेमणार आहे. अकमलने बाबर अवान यांच्या हाताखालील वकिलाची नेमणूक केली असून अवान हे पंतप्रधान आणि संसदीय कामकाज सल्लागार होते. १७ मार्च रोजी पीसीबीच्या कलम २.४.४ च्या दोन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप अकमलवर आहे. अकमलवरील बंदी क्रिकेटच्या सर्व स्वरूपात लागू असेल.
Read More एक जूनपासून हवाई वाहतूक
अकमलला फिक्स्ािंगच्या प्रस्तावाची मंडळाला माहिती न दिल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकमलवरील बंदी २० फेब्रुवारी २०२० पासून लागू झाली. पाकिस्तान सुपर लीगची पाचवी आवृत्ती सुरू होण्यापूर्वी अकमलला फिक्ंिसगची आॅफर देण्यात आली होती. पीसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहितेअंतर्गत एखाद्या खेळाडूला फिक्ंिसगसाठी काही प्रस्ताव आल्यास ते विनाविलंब मंडळाला कळवावे असे बंधनकारक आहे. तसे न केल्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे.