भारताची संस्कृती समजण्यास असमर्थ

  324
  माजी प्रशिक्षक चॅपेल यांच्यावर कैफची टीका

  नवी दिल्ली: १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, अष्टपैलू रॉबिन सिंग, फलंदाज अजय जडेजा असे काही मोठे खेळाडू मॅच फिंिक्सगमध्ये अडकले. त्यानंतर भारताने युवा खेळाडूंची फौज उभी करत आक्रमक सौरव गांगुलीला कर्णधारपद दिले. त्याचसोबत २००० साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्यांदा परदेशी प्रशिक्षकाची नेमणूक केली.

  Read More  सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला

  २००० ते २००५ या कालावधीत जॉन राईट यांनी भारतीय संघाला यशस्वी कामगिरी करून दाखवण्याची जिद्द दिली. पण त्यानंतर प्रशिक्षक म्हणून आलेल्या ग्रेग चॅपल यांची कारकीर्द तितकी यशस्वी ठरू शकली नाही. या दोघांमध्ये नेमका काय फरक होता? याबद्दल भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने मत व्यक्त केले. ‘‘चॅपल हे एक उत्तम फलंदाजी प्रशिक्षक होऊ शकले असते, पण त्यांना ते जमलं नाही. त्यांना संघातील खेळाडूंशी नीट संवाद साधता आला नाही. त्यांनी स्वत:च स्वत:ची प्रतिमा मलीन केली. कारण त्यांना भारतीय संस्कृती नीट समजूच शकली नाही.

  याउलट जॉन राईट मात्र चांगले प्रशिक्षक होते. संघातील प्रत्येक खेळाडूला ते सहकार्य करायचे. आणि महत्वाचे म्हणजे त्यांनी गांगुलीला कर्णधार म्हणून विविध निर्णय घेण्याचे स्वातंर्त्य दिले. त्यामुळे संघ अनेक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला’’, असे कैफने स्पष्ट केले.