39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeआंतरराष्ट्रीयपाकिस्तानात अघोषित मार्शल लॉ लागू!

पाकिस्तानात अघोषित मार्शल लॉ लागू!

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यासह पीटीआयच्या ८० सदस्यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. याचा अर्थ आता तो देश सोडून जाऊ शकणार नाही. त्यांच्या समर्थकांनी लष्करी प्रतिष्ठानांवर केलेल्या हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. इमरान खान यांनी देशाच्या अनेक प्रांतांमध्ये कलम २४५ लागू करण्याबाबत सरकारविरोधात याचिका दाखल केली असून, याला अघोषित ‘मार्शल लॉ’ म्हटले आहे.

पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या कलम २४५ नुसार देशाच्या रक्षणासाठी नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी लष्कराला पाचारण केले जाऊ शकते. याआधी बुधवारी देशवासियांना संबोधित करताना इम्रान खान म्हणाले होते की, त्यांच्या पक्षावर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे.

पाकिस्तान सरकार त्यांचा पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इमरान खान एका ट्विटमध्ये केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, आज सर्वात मोठा आणि एकमेव संघराज्य पक्ष कोणत्याही जबाबदारीशिवाय राज्य सत्तेच्या पूर्ण रोषाचा सामना करत आहे. वरिष्ठ नेतृत्वासह १०,००० हून अधिक पीटीआय कार्यकर्ते आणि समर्थक तुरुंगात आहेत आणि काहींना कोठडीत छळ होत आहे. असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

 

 

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या