36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रशेतीच्या वादातून काकाने केली अभियंता पुतण्याची हत्या

शेतीच्या वादातून काकाने केली अभियंता पुतण्याची हत्या

एकमत ऑनलाईन

नाशिक : शेतीच्या वादावरून काका-पुतण्यांमध्ये वाद झाल्याने त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन २८ वर्षीय युवा अभियंत्याचा मृत्यू झाला. या घटनेत काका, काकू, दोन चुलत भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली.

गुरुवारी (ता. १२) सकाळी सुनीता महाजन, त्यांचे पती आबा महाजन, मुलगा नीलेश, उमेश असे शेतात जाण्यासाठी निघाले. सामाईक हिश्­शावरील शेताजवळ पोचले. तेथे जेठ तुकाराम महाजन, जेठाणी उषाबाई महाजन, पुतण्या मनोज, मोठे जेठ सुरेश महाजन, पुतण्या अनिल महाजन आले. तुकाराम व मनोज यांच्या हातात लाकडी दांडके होते. जेठाणी उषाबाई हिच्या हातात खुरपे होते. त्या वेळेस जेठ तुकारामने, ‘तुम्ही शेतात पाय ठेवायचा नाही व शेत जूप करण्यासाठी मागायचे नाही,’ असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरवात केल्याने मोठा मुलगा उमेश त्यांना समजावून सांगत असताना तुकाराम व मनोज यांनी त्यांच्या हातातील दांडके उमेशवर उगारले. त्या वेळी सुनीता महाजन यांचा लहान मुलगा नीलेश याने मनोजच्या हातातील दांडके हवेत धरण्याचा प्रयत्न करताना त्या दांडक्याचा मार नीलेशला लागला यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या