24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeउस्मानाबादउमरग्यात वेश्या व्यवसायात अडकल्या अल्पवयीन युवती

उमरग्यात वेश्या व्यवसायात अडकल्या अल्पवयीन युवती

एकमत ऑनलाईन

उमरगा : राष्ट्रीय महामार्गावर जकेकुर-चौरस्ता परिसरातील तीन हॉटेल्सवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.३०) छापा टाकला. यामध्ये देहविक्री करणाऱ्या १६ अल्पवयीन युवती आढळून आल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. त्यांना प्रथमवर्ग न्यायालयाने वैद्यकीय चाचणी करून सुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले. तर १५ जणांना प्रथम वर्ग न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील चारजण फरार आहेत.

शहरापासून जवळच असलेल्या जकेकुर-चौरस्ता, परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहत परीसरात अवैध धंदे वाढले आहेत. अनेक हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसाय जोरात सुरू असल्याचे यावरुन स्पष्ट होते. जकेकुर-चौरस्ता येथील विविध हॉटेल व लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेस मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी पथकासह बुधवारी या भागातील तीन हॉटेल व लॉजवर छापा टाकला.

यावेळी वेश्याव्यवसाय करणाऱ्या १७ युवती, १९ युवकांसह हॉटेल मालक व चालक यांना ताब्यात घेतले. त्यापैकी चारजण फरार आहेत. गुन्हे शाखेने ३१ जणास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरूवारी पहाटे प्रथमवर्ग न्यायालयाने १६ युवतींना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करून सुधारगृहात दाखल करण्याचे आदेश दिले.

१९ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने त्यात चार जण फरार असून उर्वरीत १५ जणांना प्रथमवर्ग न्यायालयासमोर दुपारी हजर केल्यावर न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदर घटनेची स्वतंत्र तीन हॉटेल व लॉजवर गुन्हे दाखल असून यात एक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव व दोन गुंह्याचा तपास पोलीस निरीक्षक खाडे करीत आहेत. उमरगा शहर हे राष्ट्रिय महामार्गावरील ठिकाण असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध्य धंदे चालतात. चौरस्ता येथे हॉटेल, लॉज या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालविला जातो. अशा तक्रारी पोलीसांकडे आल्या होत्या.

या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. वेश्या व्यवसाय चालविणारे हॉटेल मालक, ग्राहक, तरूणी पोलीसांनी गजाआड केले आहे. पोलीसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या भागातील धंदे कायमचे बंद करावेत अशी मागणी होत आहे.

१०० रुग्णालयांतील ऑक्सिजन वापराचे ऑडिट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या