लातूर जिल्ह्यात कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य तपासणीची विशेष मोहीम हाती घ्या

    289

    लातूर : प्रतिनिधी
    परजिल्हा आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणात लोक लातूर जिल्ह्यात स्वगृही परतले आहेत. बाहेरून आलेल्या या मंडळींकडून जिल्ह्यात कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण यंत्रणांकडून आरोग्य तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्यात यावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

    कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या तिसºया आणि चौथ्या टप्प्यात काही अंशी शिथिलता मिळाल्यानंतर परजिल्हा आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणात लोक लातूर जिल्ह्यात स्वगृही परतले आहेत. या बाहेरून आलेल्या मंडळींची तपासणी केली असता त्यांच्यात कोव्हिड-१९ ची लागण झालेले अनेक रुग्ण सापडले आहेत. गेले अनेक दिवस कोव्हिड-१९ मुक्त असलेल्या लातूर जिल्ह्यात या बाहेरून स्वगृही परतलेल्या नागरिकांकडून हा प्रादुर्भाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील बाब लक्षात घेऊन आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या यंत्रणांमार्फत जिल्ह्यात पुन्हा एकदा आरोग्य तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    जेणेकरून कोव्हिड-१९ ची लागण झालेला कोणी रुग्ण लातूर जिल्ह्यात आला असेल तर त्याचा वेळीच शोध लागेल आणि त्यावर उपचारही लवकरात लवकर होतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अशा रुग्णापासून जिल्ह्यात कोव्हिड-१९ चा प्रादुर्भावही वाढणार नाही, असे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

    Read More  कोरोना : ग्रामीण भागात धाकधुक वाढली