26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक

अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करणा-या सुरेश पुजारीला बेड्या ठोकण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस सुरेश पुजारीच्या मागावर होते. २००७ मध्ये सुरेश पुजारीने भारताबाहेर पलायन केले होते. तेव्हापासून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अखेर, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आहे.
सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. आता फिलिपिन्समधून त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सुरेश पुजारी मुंबई पोलिसांप्रमाणेच एफबीआय आणि सीबीआयच्या देखील रडारवर होता. एफबीआयनेच त्याला संयुक्त कारवाईमध्ये अटक केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महत्त्वाच्या तपास यंत्रणा सुरेश पुजारीच्या मागावर होत्या. गेल्या महिन्यात २१ सप्टेंबर रोजी सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी याची माहिती इंटरपोलला दिल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पावले उचलण्यात आली. अखेर त्याला फिलिपिन्सच्या परांकी शहरातून एका इमारतीच्या बाहेर तो उभा असताना अटक करण्यात आली आहे.

कोण आहे सुरेश पुजारी?
सुरेश पुजारी एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करत होता. सुरेश पुजारी हा मूळचा कल्याणजवळच्या उल्हासनगरचा रहिवासी आहे. २००७ मध्ये त्याने देशाबाहेर पलायन केले होते. २०१२ च्या सुमारास रवी पुजारीसोबत त्याचे वाद झाल्यानंतर त्याने पुजारी गँग सोडून आपली नवी गँग बनवली होती. नवी मुंबई, ठाणे, मुंबई या भागातल्या डान्स बार चालकांना खंडणीसाठी सुरेश पुजारी गँगचे फोन येत असत. तसेच, खंडणी न देणा-यांची हत्या झाल्याच्याही काही घटना समोर आल्या आहेत. २०१८ मध्ये सुरेश पुजारीच्या शूटर्सनी कल्याण-भिवंडी महामार्गावरच्या के. एन. पार्क हॉटेलमध्ये गोळ्या चालवल्या होत्या. यात रिसेप्शनवरील एक कर्मचारी जखमी देखील झाला होता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या