नवी दिल्ली : ३३ टक्के महिला आरक्षणाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली असून, संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर होणार आहे.
संसदेच्या विशेष सत्रात महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. येत्या २० सप्टेंबर रोजी महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष सत्रात सादर होण्याची शक्यता आहे.