29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयहेलिकॉप्टर अपघातातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद थोडक्यात बचावले

हेलिकॉप्टर अपघातातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद थोडक्यात बचावले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आज एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. या दरम्यान पाटणा एअरपोर्टवर त्यांचे हेलिकॉप्टर तारेला धडकले. ज्यामुळे हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटले. या दुर्घटनेच्यावेळी मंगल पांडेय आणि संजय झा त्यांच्यासोबत होते.

पाटणा एअरपोर्टजवळ बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी ओव्हरहेड वायरला हेलिकॉप्टरचे पंखा लागला.त्यामुळे हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटले. या दुर्घटनेत रविशंकर प्रसाद सुदैवाने बचावले. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. रविशंकर प्रसाद निवडणूक प्रचार संपवून पाटण्याला परतले होते.

हेलिकॉप्टरच्या लँडिंगच्यावेळी पंखा तारेला धडकला. हेलिकॉप्टरचे दोन ते तीन ब्लेड तुटले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये रविशंकर प्रसाद, बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय आणि बिहारचे जलसिंचन मंत्री संजय झा उपस्थित होते.

मुरूम येथे नुकसानीची खासदार,आमदारांकडून पाहणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या