22.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड

उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड

एकमत ऑनलाईन

​मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांवर २१ मे रोजी निवडणुका होणार होत्या परंतु आता याची गरज भासणार नाही कारण उर्वरित ३ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहेत. त्यानंतर आता ९ जागेसाठी ९ उमेदवार मैदानात असल्यानाने सर्वांचीच बिनविरोध निवड झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी २ नोव्हेबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यामुळे त्यांना ६ महिन्याच्या आत विधानसभेचे किंवा विधानपरिषदेचे सभासद होणे आवश्यक होते.  १४ मे  हि उमेदवारी अर्ज मागे तारीख होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह इतर ८ जणांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.

Read More  ट्विटरचा कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय

शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

भाजपकडून यावेळी चार सदस्य असणार आहेत. रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली आहे. डॉ. अजित गोपचडे यांनी अर्ज दाखल केला होता परंतु, ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे रमेश कराड यांची निवड झाली.

Read More  दागिने घडविणा-या कारांगीरांवर उपासमारीची वेळ

दरम्यान सोमवारी १८ मे रोजी दुपारी १ वाजता विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधी सोहळा सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे. मुख्यमंत्रिपदाची उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्या नंतर सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारही शपथ घेणार आहेत. ​

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या