27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीय४०० रुपयांचे नाणे आणि टपाल तिकीटाचे अनावरण

४०० रुपयांचे नाणे आणि टपाल तिकीटाचे अनावरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शीख समुदायाचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्त गुरुवार दि. २१ एप्रिल रोजी ४०० रुपयांचे नाणे आणि टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ४०० रुपयांचे नाणे आणि टपाल तिकीट जारी केले. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मला गुरुंना समर्पित स्मारक टपाल तिकीट आणि नाण्याचें अनावरण करण्याचे भाग्य लाभले आहे आणि याला मी गुरुंची माझ्यावर असलेली कृपा मानतो. मला आनंद आहे की आज आपला देश आपल्या गुरुंच्या आदर्शांवर पूर्ण निष्ठेने पुढे जात आहे. या पुण्यप्रसंगी मी सर्व दहा गुरुंच्या चरणी नतमस्तक होतो. हे नाणे चलनात वापरले जाणार नाही, फक्त संग्रहात ठेवणासाठी नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे.

आपला देश आज संपूर्ण निष्ठेने गुरुंच्या आदर्शांवर पुढे जात आहे. या पुण्यदिनी मी सर्व गुरुंना नमन करतो. तसेच सर्व देशवासीयांना आणि संपूर्ण जगातील गुरुवाणीवर विश्वास ठेवणा-या सर्वांना मी प्रकाश पर्वाबद्दल अभिनंदन करतो. ही भारतभूमी केवळ एक देश नाही नाही तर मोठा वारसा आणि परंपरा आहे. याला हे आपल्या ऋषीमुनींनी, गुरुंनी शेकडो हजारो वर्षांच्या तपश्चर्येने आणि त्यांच्या विचारांना समृद्ध केले आहे असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या