26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीययूपीएससी २०२१ चा निकाल जाहीर  

यूपीएससी २०२१ चा निकाल जाहीर  

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२१ च्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पहिल्या तीन टॉपर्स मुली आहेत. यामध्ये श्रुती शर्माने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, द्वितीय अंकिता अग्रवाल आणि तृतीय क्रमांकांवर गामिनी सिंगला आहेत.

अंतिम निकाल लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल. यंदा एकूण ६८५ उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. श्रुती शर्मा सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे. ती जामिया इस्लामिया कोचिंग अकादमीमध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती.

टॉप फाईव्हमध्ये फक्त एकच मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे उत्कर्ष द्विवेदी. चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा मुलगीच आहे आणि ती आहे ऐश्वर्या वर्मा. टॉप फाईव्हमध्ये एकही मराठी नाही हेही निकालाचे वैशिष्ट्य मानावे लागेल.

यावर्षी परीक्षा ५ जूनला पार पडणार
या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षा ५ जून रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी यूपीएससीने उमेदवारांना ओएमआर शीट कशी भरायची ते सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या