27.3 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeमनोरंजनउर्फीने रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी १३ दिला नकार

उर्फीने रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी १३ दिला नकार

एकमत ऑनलाईन

मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्ड आणि अतरंगी फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. मात्र, उर्फी तिच्या विचित्र ड्रेंिसग स्टाइलमुळे खूप ट्रोल झाली आहे आणि अलीकडेच, उर्फी खतरों के खिलाडी १३ च्या अपकमिंग सीझनमध्ये सामील झाल्याच्या बातम्या आल्या.

मात्र, आता ही अभिनेत्री रिअ‍ॅलिटी शोच्या आगामी सीझनचा भाग नसल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की उर्फी खतरों के खिलाडी १३ च्या टीमसोबत ब-याच दिवसांपासून चर्चा करत होती आणि तिलाही हा शो करण्यात खूप रस होता. पण बॅडलकमुळे ती या शोचा भाग होऊ शकली नाही. उर्फी एका मोठ्या प्रोजेक्टसाठी कोणाशी तरी बोलणी करत होती आणि ते खतरों के खिलाडीची ऑफर स्वीकारण्यापूर्वीच फायनल झाले होते, त्यामुळे तिला शो सोडावा लागला होता. अभिनेत्री तिच्या मोठ्या प्रोजेक्टबद्दल खूप उत्साहित आहे आणि लवकरच ही बातमी तिच्या चाहत्यांशी शेअर करणार आहे.

उर्फी तिच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. ती अलीकडेच एका साऊथ मॅगझिनच्या डिजिटल कव्हरवर डिझायनर कपड्यांसह दिसली. ती प्रसिद्ध डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या नवीन कलेक्शनची मॉडेल देखील बनली. उर्फी शेवटची स्प्लिट्सविला ४ मध्ये मिसचीफ मेकर म्हणून दिसली होती. यावेळी हा शो सनी लिओनी आणि अर्जुन बिजलानी यांनी होस्ट केला होता.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या