24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारताबरोबर सैन्य संबंध वाढविण्यासाठी अमेरिकेची १८ कलमी योजना

भारताबरोबर सैन्य संबंध वाढविण्यासाठी अमेरिकेची १८ कलमी योजना

एकमत ऑनलाईन

अमेरिकेत चीनविरोधात प्रचंड राग:

अमेरिका : चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकाला बसला आहे. चीनने व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यात असतानाच जगाला या संदर्भात माहिती न दिल्याने अमेरिकेत चीनविरोधात प्रचंड राग आहे. याच पार्श्वभुमीवर आता एका वरिष्ठ अमेरिकन सीनेटरने चीनवर निर्बंध लादण्यासाठी आणि भारताबरोबर सैन्य संबंध वाढविण्यासाठी १८ कलमी योजना सादर केली आहे.

नुकसान भरपाईसाठी चीनवर निर्बंध लावण्याची मागणी
सीनेटर थॉम टिलिस म्हणाले की, चीनने कोरोना व्हायरस पसरवला आहे, ज्याद्वारे लाखो अमेरिकन ग्रस्त झाले. अमेरिकन लोकांच्या आरोग्याची रक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या नुकसान भरपाईसाठी चीनवर निर्बंध लावण्यात यावेत.

Read More उस्मानाबाद जिल्ह्यात आढळले 3 नवे रुग्ण

२० बिलियन डॉलर्सचा निधी
मित्र देशांबरोबर सैन्य सहकार्य वाढविण्यासाठी पॅसिफिक डिटरेंस इनिशिएटिव्ह नावाच्या एका कार्यक्रमाची सुरूवात करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यात सैन्याच्या सामानासाठी २० बिलियन डॉलर्सचा निधी देखील अमेरिकाच देईल. या योजनेद्वारे प्रादेशिक मित्रपक्षांसह सैन्य संबंध मजबूत होतील. याशिवाय सीनेटरने भारत, तायवान आणि व्हिएतनामला स्टेट आॅफ द आर्ट सैन्य उपकरणांच्या विक्रीसाठी मंजूरी देण्याची मागणी केली आहे.

मित्र देशांना देखील चीनवर असेच निर्बंध लादण्यास सांगावे
त्यांनी आपल्या योजनेविषयी सांगितले की, चीनमधील सर्व अमेरिकन उत्पादन कंपन्यांना देशात परत आणण्यात यावे. चीनवरील सामानांची निर्भरता संपुष्टात आणावी. चीनला आपले तंत्र चोरी करण्यापासून रोखायला हवे. सीनेटर ट्रम्प यांना आवाहन करत म्हणाले की, दुसºया मित्र देशांना देखील चीनवर असेच निर्बंध लादण्यास सांगावे. ज्याद्वारे चीनला त्याची शिक्षा मिळेल. आपण मिळून चीनी हॅकर्सला देखील रोखू आणि आपली सायबर सुरक्षा देखील मजबूत करू.

….इतर उपायांवर केला जात आहे विचार
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुष्टी केली आहे की त्यांच्या प्रशासनाने चीनकडून अमेरिकन पेन्शन फंडातील कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक मागे घेण्यास सांगितले आहे आणि इतर उपायांवर विचार केला जात आहे. बौद्धिक संपत्ती आणि संशोधन कायार्शी संबंधित माहिती चोरल्याचा आरोपही चीनवर करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या