29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकी लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; पायलटसह २ ठार

अमेरिकी लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; पायलटसह २ ठार

एकमत ऑनलाईन

अलाबामा : अमेरिकेतील अलाबामा येथे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर डाउनटाउन हंट्सविलेपासून सुमारे १० मैल अंतरावर अलाबामा-टेनेसी सीमेजवळ महामार्ग ५३वर क्रॅश झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे टेनेसी नॅशनल गार्डचे यूएच-६० हेलिकॉप्टर होते जे नियमित प्रशिक्षणावर होते. मॅडिसन पोलिस अधिका-यांना स्थानिक वेळेनुसार पहाटे३ च्या सुमारास ९११ वर कॉल आला. हेलिकॉप्टर कसे कोसळले हे अद्याप समजू शकलेले नाही.

हेलिकॉप्टर कसे कोसळले हे अद्याप समजू शकलेले नाही. मॅडिसन पोलिस अधिका-यांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती देणारे पहिले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली ज्यातून कोणीही वाचू शकले नाही. मात्र, हेलिकॉप्टर का कोसळले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. नॅशनल गार्डच्या अधिका-याने सांगितले की, उर्वरित लष्करी विमानांप्रमाणे या हेलिकॉप्टरच्या अपघाताचीही चौकशी केली जाईल. अपघाताच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या