Thursday, September 28, 2023

पाकिस्तानला अमेरिकेकडून ४५ कोटींची आर्थिक मदत

करोनाचा सामना करण्यासाठी मदत देणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश
पॉल जोन्स यांनी आपल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानला ईदच्या शुभेच्छाही दिल्या….

पाकिस्तान : अमेरिकेने करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला ४५ कोटी ५८ लाख २० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. अमेरिकेचे पाकिस्तानमधील राजदूत पॉल जोन्स यांनी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की आर्थिक मदतीमुळे पाकिस्तानला करोनाचा सामना करण्यास मदत मिळेल.

Read More  आमच्या येथून झालेली नाही कोरोनाची उत्पत्ती – वुहान लॅब

आर्थिक मदतीमुळे पाकिस्तानला कोरोनाची लागण असलेल्या रुग्णांची काळजी घेणार्‍या आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात वाढ करता येईल असे त्यांनी म्टटले. या व्यतिरिक्त संक्रमित भागांमध्ये राहणार्‍या पाकिस्तानी रहिवाश्यांची तपासणीसाठी मोबाइल प्रयोगशाळा देखील तयार केली जाईल.

करोनाचा सामना करण्यासाठी मदत देणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश असून अमेरिका पाकिस्तानला एकूण १५९ कोटींची मदत करणार असल्याचं दुतावासाकडून सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानात करोना व्हायरस रुग्णांची संख्या ५२ हजाराहून जास्त झाली आहे. तर मृतांची संख्या १ हजार १०१ वर पोहोचली आहे. पॉल जोन्स यांनी आपल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानला ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या