22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयराष्ट्रगीतातील उत्कल बंग वगळले

राष्ट्रगीतातील उत्कल बंग वगळले

एकमत ऑनलाईन

उत्तर प्रदेशातील प्रकार, कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा
लखनौ : उत्तर प्रदेशातील तब्बल अडीच लाख सरकारी पुस्तकांतील राष्ट्रगीतात ‘उत्कल बंग’हे दोन शब्द नसल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. काँग्रेसने या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवत आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर संबंधित अधिका-यांनी ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावा करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेसचे कौशांबी जिल्हाध्यक्ष अरुण विद्यार्थी म्हणाले की, भाजपला बंगालचा पराभव अद्याप सलत आहे. त्यामुळे त्यांनी जाणिवपूर्वक राष्ट्रगीतातून उत्कल व बंग हे दोन शब्द वगळले आहेत. काँग्रेस या प्रकरणी रस्त्यावर उतरेल. दुसरीकडे, या प्रकरणी वाद वाढल्यानंतर कौशांबीचे बीएसए प्रकाश सिंग यांनी हा प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावा केला. पुस्तक छापताना ही चूक झाली. पुस्तकातील राष्ट्रगीताच्या ओळीत चूक झाली. सामान्यत: अशी चूक प्रिंटिंगची मानली जाते. पण असे राष्ट्रगीताच्या बाबतीत घडल्यामुळे संबंधित अधिका-यांना त्याची माहिती दिली जाईल. याचा तपासही केला जाईल. ही राज्य पातळीवरील गोष्ट आहे, असे म्हटले.

राज्य सरकारने ही पुस्तके कौशांबीच्या पालिका शाळांसाठी पाठवली आहेत. एकट्या कौशांबी जिल्ह्याची गोष्ट केली, तर १०८९ पालिका शाळा आहेत. त्यात पहिली ते ८ वीपर्यंतचे १ लाख ८२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

चुकीचे राष्ट्रगीत छापले
वाटिका नामक पुस्तकात चुकीचे राष्ट्रगीत छापण्यात आले आहे. हे पुस्तक इयत्ता पाचवीचे आहे. या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर राष्ट्रगीत लिहिले आहे. त्यात पंजाब-सिंध-गुजरात-मराठी-द्राविड….नंतर उत्कल बंग शब्द नाही. त्यानंतर ५ वी ओळ थेट विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा या शब्दांनी सुरू होते. ही चूक पाचवीच्या एक-दोन नव्हे तर सर्वच पुस्तकांत झाली आहे. त्यामुळे प्रकरण गंभीर आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या