22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रआतापर्यंत ७२ लाख पशुधनास लसीकरण

आतापर्यंत ७२ लाख पशुधनास लसीकरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या देशातील अनेक राज्यांत लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही जनावरांना या लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सध्या पशुपालक चिंतेत आहेत. मात्र, मागील १५ ते २० दिवसांच्या तुलनेत गेल्या दोन-तीन दिवसांत लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. याचे कारण म्हणजे आतापर्यंत आपण ७० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. ७२ लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण केल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

राजस्थान आणि पंजाबच्या तुलनेत आपल्या राज्यात जनावरांचा मृत्युदर कमी आहे. आपण मृत्यू झालेल्या दुधाळ गायींना ३५ हजार, बैलांना २५ हजार अशी मदत देत असल्याचे विखे पाटील म्हणाले. सध्या औषध आणि लसीकरणाचा खर्च राज्य सरकार करीत आहे. तसेच उपचारावेळी डॉक्टरांकडून काही निष्काळजी झाल्याचे दिसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती देखील विखे पाटील यांनी दिली. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज अमरावती जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.

वरुड तालुक्यातील पुसला येथे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विखे पाटील यांनी वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट येथे लम्पीबाधित जनावरांची पाहणी करून शेतक-यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सध्या जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण होत आहे. राजस्थानमध्ये लम्पी स्कीनमुळे ६२ हजार जनावरांचा आणि पंजाबमध्ये २२ हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. पण महाराष्ट्रात आपण लसीकरण सुरू केले आहे. त्यामुळे आता हा रोग कमी झाला असल्याचे विखे पाटील म्हणाले.

सध्या जर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असते तर यात कमिशन मिळते का ते पाहिले असते, अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली. लम्पी आजार सुरू झाल्यावर राज्यातील पशु ऑफिसमध्ये फक्त शिपाई राहिला, सगळ्या अधिका-यांना फिल्डवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. त्याचा आढावा मी दररोज घेत असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या