37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयदेशात आतापर्यंत ८,०६,४८४ लोकांचे लसीकरण

देशात आतापर्यंत ८,०६,४८४ लोकांचे लसीकरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाचे नवे १५,२२३ रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही १,०६,१०,८८३ वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत १९,९६५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या ब-या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण ब-या झालेल्या रुग्णांची संख्या ही १,०२,६५,७०६ वर जाऊन पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत. १५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही १,५२,८६९ वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात १,९२,३०८ रुग्ण क्टीव्ह आहेत. तर देशात आतापर्यंत ८,०६,४८४ लोकांचे लसीकरण पार पडले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या २४ तासांत देशात ७,८०,८३५ चाचण्या केल्या गेल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही १८,९३,४७,७८२ वर जाऊन पोहोचली आहे.

भास्करराव पेरे-पाटील मीडियावर नाराज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या