23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeवैराग टू संग्रामनगर कोरोना कनेक्शन

वैराग टू संग्रामनगर कोरोना कनेक्शन

एकमत ऑनलाईन

तालुका प्रतिनिधी/अकलूज/बार्शी
बार्शी तालुक्यातील वैराग येथील एका किराणा व्यापा-याला कोरोना संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार पुणे येथे करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. वैराग येथील १५ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान वैराग टू संग्रामनगर कोरोना कनेक्शन निर्माण झाल्याची चर्चा होत आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने संग्रामनगर येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने संग्रामनगर-अकलूज येथील एका किराणा होलसेल व्यापा-याच्या कुटुूंबातील ५ व्यक्तींना तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालय अकलूज येथे आणण्यात आले.

Read More  सुधारणा म्हणजे कामगार कायद्यांचे उच्चाटन नव्हे!

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अकलूज येथील होलसेल किराणा व्यापारी त्यांच्या वैराग येथील सासरवाडीला दोन दिवसांपुर्वी गेले होते. सदर सासरवाडीतील व्यक्ती काल आरोग्य विभागास कोरोना पॉझीटीव्ह आढळून आली. संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाने घेतली असता अकलूज येथील व्यापा-याची माहिती मिळाली. सदर व्यापाºयाचे घर सील करण्यात आले असून त्यांच्या कुटुूंबातील ५ व्यक्तींचा स्वॅब तपासण्यासाठी त्यांना अकलूज उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आल्यानंतर त्यांना अहवाल येईपर्यत कॉरन्टाईन करून ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५४ कोरोनाबाधित रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. तर ५२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ५९० इतकी रुग्णसंख्या झाली आहे. १०२ कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले होते. यात ९५ निगेटिव्ह तर ७ पॉझिटिव्ह आणि एक मृताचा समावेश आहे. आतापर्यंत ५ हजार ६४५ अहवाल प्राप्त झाले असून यातील ५०५५ निगेटिव्ह तर ५९० पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आतापर्यंत ५९० पैकी २५४ जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

संग्रामनगर येथे कोणीही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. अफवावर विश्वास ठेऊ नका. घरातच बसा घरीच राहुन सहकार्य करा.
– राजवर्धनी माने पाटील (सरपंच)

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या