23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रचार महिन्यांनी वसंत मोरेंचा पक्ष कार्यालयात प्रवेश

चार महिन्यांनी वसंत मोरेंचा पक्ष कार्यालयात प्रवेश

एकमत ऑनलाईन

पुणे : मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे चार महिन्यानंतर पक्ष कार्यालयात आले. पुण्यातील स्थानिक नेत्यांसोबत मोरेंच पटत नसल्याने पक्ष कार्यालयापासून ते दुर असतात. मात्र आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली. यावेळी वसंत राज ठाकरेंच्या सोबत पक्ष कार्यालयात आले.

वसंत मोरेंकडे नुकतीच बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मनसेने बारामतीतुन उमेदवार उभे करायच ठरवलं आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी वसंत मोरेंनी कंबर कसली कसली आहे. बारामतीत नेमकं काम कसं करायचं? याचं ते नियोजन करत आहेत. बारामतील प्रचारादरम्यान राज ठाकरे यांना बोलवण्याचा मानस असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मनसेवर नाराज असल्याचं चित्र दिसत होतं. वसंत मोरे हे पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय भाग घेत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे आता वसंत मोरे यांना थेट सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्याा आदेशानुसार पुणे ग्रामीण- मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या