चलो अब शाकाहारी हो जाए : चीनच्या राजकीय बैठकांमधून मांसाहार हद्दपार करण्याचा प्रस्ताव
बिजिंग : वुहानच्या प्राणी बाजारातून पसरलेल्या कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगात लाखो लोकांचे जीव गेले आहेत. कोरोनाच्या या संकटामध्ये चीनच्या राजकीय पक्षाने त्यांच्या बैठकांमध्ये शाकहारी भोजन द्यायचा निर्णय घेतला आहे. चीनमधला राजकीय पक्ष चायनीज पिपल्स पॉलिटिकल कन्सलटेटिव्ह कॉन्फरन्स (सीपीपीसीसी)च्या सदस्याने पुढच्या २ सत्रांसाठी पक्षाच्या बैठकीत शाकहारी जेवण ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Read More जळगावमध्ये आणखी 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
कोरोना व्हायरसमुळे जगभरात ३,२५,२१४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ५० लाखांपेक्षा जास्त लोक या व्हायरसमुळे संक्रमित झाले आहेत. सीपीपीसीसी पक्षाचे सदस्य शूं जींकून यांनी आरोप केला आहे की चीनी सरकारने वन्यजीवांच्या सेवनावर बंदी घातल्यानंतरही सरकारी मेजवान्यांमध्ये वन्यजीवांचं मांस दिलं जात आहे. कोरोना व्हायरसमुळे जगात चीनची मोठ्याप्रमाणावर नाचक्की झाली आहे. त्यामुळे आपली प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.