21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले.

प्रदीप पटवर्धन यांनी गिरगाव येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन हा रंगभूमीवरचा हसरा चेहरा हरपला आहे. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

प्रदीप पटवर्धन यांनी अनेक नाटके आणि सिनेमांमध्ये अभिनय केला असून त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. प्रदीप पटवर्धन यांनी कॉलेजमध्ये असताना अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यांची ‘मोरूची मावशी’ या नाटकातील भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रदीप पटवर्धन यांनी मराठी सिनेसृष्टीतील एक फुल चार हाफ, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गोला बेरीज आणि बॉम्बे वेल्वेट, पोलिस लाईन, नवरा माझा नवसाचा आणि, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सिनेमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या