16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे रात्री उशिरा निधन झाले. केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या. सरफरोश, गांधी, वास्तव अशा अनेक हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

सुनील शेंडे यांचे रात्री १ वाजता विलेपार्ले पूर्व इथल्या राहत्या घरी निधन झाले. आज दुपारी त्यांचा अंत्यविधी होणार आहे. मुंबईतल्या पारशीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार केले जाणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या