नवी दिल्ली : भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराती याने प्रो शतरंज लीग स्पर्धेतील सामन्यात वर्ल्ड सॅम्पियन मॅग्नस कार्लसन याचा पराभव करत मोठा उलटफेर केला आहे. नार्वेच्या मॅग्नस कार्लसन याला भारताच्या बुद्धीबळपटूकडून पराभवाचा सामना करावा लागला. कार्लसन याच्यावर विदित गुजराती याचा पहिला विजय आहे. इंडियन योगीजकडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसन याच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. कार्लसन याचा पराभव हा स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर म्हटले जात आहे.
मॅग्नस कार्लसन कनाडा चेसब्रासकडून प्रो शतरंज लीग मध्ये खेळत आहे. या स्पर्धेकडे जगभरातील बुद्धीपळ चाहत्यांचे लक्ष होते. ऑनलाईन स्पर्धेत १६ संघांनी भाग घेतला आहे. त्यांच्यामध्ये रॅपिड गेम सुरु आहे. २८ वर्षीय विदित गुजराती याने कार्लसनचा पराभव करत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर गुजराती क्रीडा जगतात चर्चेचा विषय बनला आहे.
प्रो शतरंज लीगमध्ये गुजरातीने पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनचा पराभव केला. विजयानंतर गुजराती म्हणाला की, बुद्धिबळातील सर्वकालीन खेळाडूला हरवणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्तम क्षण आहे, याला कधीच विसरु शकत नाही. मॅग्नस कार्लसन याचा पराभव करत विदित गुजराती भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद, डी गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांच्या रांगेत स्थान मिळवले आहे. गुजरातीआधी या तिन्ही खेळाडूंनी २०२२ मध्ये वेगवेगळ््या स्पर्धेत कार्लसनचा पराभव केला आहे.