28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रआता विद्या चव्हाण कंबोजच्या रडारवर

आता विद्या चव्हाण कंबोजच्या रडारवर

एकमत ऑनलाईन

मुंबई : मोहीत कंबोज यांनी पुन्हा राष्ट्रवादीलाच डिवचले आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे. गेल्या महिन्यांपासून मोहीत कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादी असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा, अजित पवार त्यानंतर रोहित पवार आणि आता विद्या चव्हाण. कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे.

मोहित कंबोज यांनी ‘विद्याताई चव्हाणजी को जय श्रीराम’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे. तासाभरातच कंबोज यांनी आणखी एक ट्विट केले. यामध्ये कंबोज यांनी विद्या चव्हाण यांचा उल्लेख केला नसला तरी इशा-याचा रोख विद्या चव्हाण यांच्या दिशेनेच असल्याची चर्चा आहे. या ट्विटमध्ये कंबोज यांनी म्हटले आहे की, लगाम दिसत नसला तरी तोंडावर तो असला पाहिजे. विनाकारण आमच्याशी वाद उकरून काढलात तर मग तयार राहा. हा फक्त एक ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे, असे सूचक वक्तव्य केलं आहे.

त्यामुळे आता मोहित कंबोज आगामी काळात कोणता खळबळजनक खुलासा करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.

बिल्कीस बानो प्रकरणात ११ जणांची सुटका करण्यात आली यावरून राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदही घेतली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या