21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयइंटरनेट वापरात गावे शहरांना मागे टाकणार!

इंटरनेट वापरात गावे शहरांना मागे टाकणार!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागच्या काळात इंटरनेट वापर शहरी भागापर्यंतच मर्यादित होता. मात्र, अ‍ँड्रॉईड मोबाईलचा वापर वाढल्याने सोबत इंटरनेटचा वापर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतासारख्या देशात इंटरनेट युजर्सची संख्या ४५ टक्क्यांच्या सरासरीत वाढत आहे. इंटरनेट वापराचा हा वेग पाहता २०२५ पर्यंत देशात तब्बल ९० कोटींवर अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट युजर्स होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

त्यावेळी शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात इंटरनेटचा अधिक वापर झाल्याचे पाहायला मिळेल, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. मागच्या वर्षीपर्यंत देशात इंटरनेट युजर्सची संख्या ६२.२ कोटींवर होती. दरवर्षी यात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. याच विचार करता २०२५ पर्यंत अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट युजर्सची संख्या ९० कोटींवर जाऊ शकते. त्यावेळी इंटरनेट वापरात शहरी भागापेक्षा ग्रामीण भाग पुढे असेल, तर एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.

इन्साईटस् डिव्हिजनचे कार्यकारी उपाध्यक्ष विश्वप्रिया भट्टाचार्य यांच्या मते आगामी काळ व्हॉईस आणि व्हिडीओ डिजिटल इकोसिस्टमसाठी गेमचेंजर असू शकेल. या अहवालानुसार सध्या ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील इंटरनेट वापर अजूनही दोन पटीने अधिक आहे. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट युजर्सची संख्या दरवर्षी मोठ्या संख्येने वाढत असून, हे प्रमाण शहरांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे येणा-या काळात शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर अधिक असेल.

इंटरनेट कंपनी बॉडी आयएएमएआयने कन्सल्टिंग कंपनी कांटरच्या सहकार्याने देशातील इंटरनेट युजर्सचा अभ्यास केला. यात छोट्या गावांत ५ पैकी २ युजर्स अ‍ॅक्टिव्ह असल्याचे आढळून आले, तर टॉप ९ मेट्रो शहरांत अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट युजर्सची संख्या ३३ टक्के आहे. नव्या अहवालात ग्रामीण भागात अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट युजर्सची संख्या वेगाने वाढत असल्याचे नमूद करण्यात आले असून, १० पैकी ९ अ‍ॅक्टिव्ह युजर्स डेली इंटरनेट अ‍ॅक्सेस करतात, तर अ‍ॅक्टिव्ह युजर्स सरासरी रोज १.८ तास इंटरनेटवर घालवतात. विशेष म्हणजे शहरी अ‍ॅक्टिव्ह युजर्स ग्रामीण युजर्सच्या तुलनेत १७ टक्के अधिक वेळ इंटरनेटवर घालवतात.

लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ४३ टक्केच युजर्स
देशातील इंटरनेट युजर्सचा विचार केल्यास तब्बल १४३.३ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात ६२.२ कोटी अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट युजर्स आहेत. देशातील इंटरनेट युजर्सचे हे प्रमाण ४३ टक्के एवढे आहे. यामध्ये तुलनेने विचार केल्यास सध्या ग्रामीण भागात अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट युजर्सची संख्या खूप कमी आहे. मात्र, आगामी काळात ग्रामीण भागात इंटरनेट युजर्सची संख्या वेगाने वाढणार आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील युजर्सच्या संख्येत १३ टक्के वेगाने वाढ
एक काळ असा होता की, इंटरनेट सुविधा शहरांपर्यंतच मर्यादित होती. परंतु इंटरनेटची सुविधा ग्रामीण भागात पोहोचतानाच अ‍ँड्रॉईड मोबाईलचा वापरही सर्रास सुरू झाला. तसेच इतर सुविधाही गावोगाव पोहोचल्या. त्यामुळे ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर वेगाने वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी शहरांपेक्षा ग्रामीण भागातील इंटरनेट युजर्सची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. सध्या देशात शहरी भागात इंटरनेट युजर्सची संख्या ४ टक्क्यांच्या सरासरीत वाढत ३२.३ कोटींवर पोहोचली आहे, तर ग्रामीण भागातील इंटरनेटची संख्या १३ टक्क्यांच्या सरासरीने २९.९ कोटींवर पोहोचली आहे.

ग्रामीण भागातील वेग तुलनेने अधिक
अलीकडे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील इंटरनेट युजर्सची संख्या अधिक वेगाने वाढत आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील इंटरनेट युजर्सच्या संख्येचा अतिवेग पाहता २०२५ पर्यंत ग्रामीण भागातील युजर्स शहरी भागांवर मात करू शकतात. अर्थात, ग्रामीण भागातील युजर्सची संख्या मोठी असणार आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

१२ वी परीक्षा रद्दची अधिकृत घोषणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या