24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeऔराद येथील बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

औराद येथील बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

एकमत ऑनलाईन

निलंगा : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी लातूर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे निलंगा तालुक्यातील औराद येथील बाजारपेठ व व्यवहारी नियमांचे पालन केले जात नाही, याची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी निलंगा विकास माने, तहसीलदार गणेश जाधव यांनी धावती भेट देऊन बाजारपेठेची पाहणी केली. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नाकाबंदीस भेट देऊन तेथील लावण्यात आलेल्या यंत्रणेची पाहणी केली.

लातूर जिल्हाधिकारी यांनी दि २५ मे रोजी व्यापारपेठेतील वेगवेगळे व्यापार वेगवेगळ्या दिवशी सुरू ठेवावेत असा आदेश पारित केलेला आहे. मात्र येथील ग्रामविकास अधिकारी, पोलिस प्रशासन, व्यापारी संघटना यांनी दैनंदिन व्यापार सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सुरू ठेवायचा असा फतवा काढून त्या पद्धतीने व्यापार केला जात आहे. या विषयी तहसीलदार गणेश जाधव यांनी येथील ग्रामविकास अधिकारी धनाजी धनासुरे यांना चांगलेच धारेवर घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे व्यापार सुरू करीत नाहीत व येथील व्यवहार चालत नाहीत म्हणजे औराद का लातूर जिल्ह्यातील बाहेरील आहे असा खडा सवाल ग्राम विकास अधिकारी धनासुरे यांना विचारला . तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे फलक गावातील चौकांत लावून त्या आदेशाप्रमाणे येथील व्यापार सुरू करावा, असे सूचित करून एका पथकामार्फत सोशल डिस्टन्स व मास्क वापर करीत आहेत का हे पाहावे अन्यथा मास्क न वापरणाºया नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करावा असे आदेशित करण्यात आले आहे.

Read More  टी-२० वर्ल्ड कपबद्दल आज होणार औपचारिक घोषणा!

कर्नाटकातून आलेले ५३ जण होमक्वारंटाईन
महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवरील दोन्ही राजाकडे जाणाºया येणाºया प्रवाशांची तपासणी करून होम क्वाारंनटाईन केले जात आहे़ याची पाहणी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव यांनी केली़ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य बंदी करण्यात आली असून महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्याकडून आपल्या सीमा कडेकोट बंद करून २४ तास डॉक्टर पथकासह पोलिस पथक , शिक्षक पथक याठिकाणी सेवा बजावत आहेत.

जे लोक परवानगी घेऊन प्रवास करीत आहेत अशा लोकांना होम क्वारंनटाईन शिक्का मारून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येत आहे़ गत तीन दिवसांत कर्नाटकातून आलेल्या ५३ जणांना होम कॉरनटाईन केल्याची नोंद आढळली़ बुधवारी अचानक उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार गणेश जाधव यांच्या पथकाने पाहणी केली यावेळी औरादचे सरपंच मैनोद्दीन बागवान , ग्राम विकास अधिकारी धनाजी धनासुरे दोन्ही राज्यातील पोलिस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या