नवी दिल्ली, २८ मे: भाजपाच्या मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ३० मे रोजी भाजप देशभर १००० व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सेस व ७५० व्हर्च्युअल रॅलीज घेणार आहे. त्यापूर्वीच दोन दिवस अगोदर काँग्रेसने त्यांच्या १३५ वर्षांच्या इतिहासातील पहिलेच ऑनलाईन आंदोलन केले. कोरोना महामारीचे वाढत चाललेले संकट, स्थलांतरित मजुरांचे होणारे हाल, शेतकरी, छोटे दुकानदार व छोट्या उद्योजकांना हवे असलेले पॅकेज या मुद्द्यांवर काँग्रेसने हे ऑनलाईन आंदोलन केले. या आंदोलनात देशभरातील काँग्रेसच्या ५० लाख कार्यकर्त्यांनी ऑनलाईन सहभाग घेतल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभर लागलेल्या लॉकडाऊनमुळे आणि संचार बंदीमुळे मजूर शेतकरी आणि गरीब लोकांचे हाल होत आहेत. या घटकांना मदत देण्याची मागणी करत काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात हे ऑनलाईन आंदोलन केले. त्यापूर्वी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मागणी केली की, मोदी सरकारने गरिबांसाठी खजिन्याचे कुलुप उघडले पाहिजे, जे लोक इन्कम टॅक्सच्या परिघाबाहेर आहेत अशा लोकांच्या खात्यात केंद्र सरकारने १०,००० रुपयांची मदत तात्काळ जमा केली पाहिजे, गरीबांना रोजगार मिळावा म्हणून मनरेगाची कामे १०० दिवसांऐवजी २०० दिवस सुरू ठेवली पाहिजेत.
Read More सोलापुरात कोरोनाचा कहर
सोनिया गांधी म्हणाल्या, ‘देश फाळणीनंतरच्या सर्वात मोठ्या अरिष्टातून जात आहे. गरीब, मजूर, छोटे व्यापारी आणि शेतकरी चिंतित आहेत. देशातील प्रत्येक व्यक्ती त्यांना होणारा त्रास अनुभवत आहे. मात्र, सरकारवर याचा कसलाही परिणाम होताना दिसत नाही. आम्ही सरकारला वारंवार सूचना केल्या मात्र, सरकार समून घ्यायला तयार नाही. त्यामुळे आता काँग्रेसने भारताचा आवाज उंचावण्याचा विडा उचलला आहे. सरकारने तत्काळ आपला खजिना खुला करून गरिबांना मदत करायला हवी.’
It's time for every Indian to stand together & speak up in one voice. #SpeakUpIndia
for our brothers & sisters struggling for survival;
for those whose voice has been silenced;
for those in despair & are fearful.
We are India.
Together we can make a difference. pic.twitter.com/7Q6R2rcWuP
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 28, 2020