28.9 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeमहाराष्ट्रकॉंग्रेसची जोरदार निदर्शने, भाजपचेही राज्यात आंदोलन

कॉंग्रेसची जोरदार निदर्शने, भाजपचेही राज्यात आंदोलन

एकमत ऑनलाईन

नेते, कार्यकर्ते रस्त्यावर, कारवाईचा निषेध
मुंबई : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने कॉंग्रेससह विरोधी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले असून, या कारवाईच्या निषेधार्थ राज्यासह देशभरात सर्वत्र जोरदार निदर्शने करण्यात आली. ठिकठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे भाजपनेही राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले.

राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई केल्याने कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबई, नागपूर, नाशिक, छ. संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणी कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारचा निषेध केला. लातूर, बीडमध्येही कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले. धाराशिवमध्येही महाविकास आघाडीने आंदोलन केले. मोदी सरकार शासकीय संस्थांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. यवतमाळमध्येही काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. भाजप सरकारने हुकूमशाही पध्दतीने कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस पदाधिका-यांनी केला.

ओबीसी समाजाचा अपमान केल्यामुळे देशभरात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरली असून राज्यात भाजप व शिवसेना शिंदे गटाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारून आपला निषेध नोंदवला. तसेच भंडा-यातही खा. सुनील मेंढे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून राहुल गांधी यांचा निषेध नोंदविला. चंद्रपूरमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या