25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाविराट-अनुष्का झाले अलिबागकर

विराट-अनुष्का झाले अलिबागकर

एकमत ऑनलाईन

८ एकर जमिनीची खरेदी, फार्महाऊस बांधणार
मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. विराट कोहलीने अलिबागजवळ झिराड येथे ८ एकर जागा खरेदी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विराट कोहली या ८ एकर जागेवर फार्महाऊस बांधणार आहे. विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने ३० ऑगस्ट रोजी या जागेचे सर्व व्यवहार पूर्ण केले.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी सहा महिन्यापूर्वी झिराड येथील जागेची पाहणी केली होती. आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना अलिबागमधील या जागेची खरेदी पूर्ण करण्यास वेळ नव्हता. त्यामुळे विराट कोहलीचा भाऊ विकास याने जागेची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने झिराडजवळ घेतलेल्या ८ एकर जागेसाठी १९ कोटी २४ लाख ५० हजार रुपये मोजले आहेत. विराट कोहलीचा भाऊ विकास याने १ कोटी १५ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली. मंगळवारी विकास कोहलीने निबंधक कार्यालयात उपस्थित राहून हा व्यवहार रजिस्टर केला. हा सर्व व्यवहार समिरा हॉबिटॅट्स रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून झाला. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अलिबाग या निसर्गरम्य शहरात अनेकजण फिरण्यासाठी येतात. येथे व्यावसायिक, सिनेकलाकारांसह क्रिकेटपटूही आपले दुसरे घर अथवा फार्म हाऊससाठी पसंती देत आहेत. क्रिकेटर, कलाकार, राजकीय नेते, उद्योजक हे अलिबागकर झाले आहेत. यामध्ये आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची भर पडली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या