बेळगाव : कर्नाटकात विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. कर्नाटक विधानसभेसाठी एकाच टप्यात १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल लागणार आहे. आता अश्यातच सोशल मिडियावर प्रचारादरम्यानचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याने स्पीकर घेऊन थेट भाजपच्या सभेत जाऊन विश्वजित कदमांचे भाषण ऐकवले.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आ.अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जांबोटी या गावामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जवळच भाजपची सभा आयोजित केली गेली होती. यावेळी काँग्रेसचा कार्यकर्ता थेट स्पीकर घेऊन भाजपच्या सभे शेजारी उभा राहिला. काँग्रेसची होणारी ही सभा भाजपच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ऐकावी म्हणून हा कार्यकर्ता खांद्यावर स्पीकर घेऊन फिरत होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.