निलंगा : निलंगा तालुक्यातील जाऊ येथील शासकीय मुलीचे वस्तिगृह कोवीड १९ सेंटरला आ. अभिमन्यू पवार यांनी मंगळवारी १९ मे रोजी भेट देऊन त्या ठिकाणी ठेवण्यात असलेल्या कोरोना रूग्णांच्या संदर्भात होत असलेल्या उपचाराबाबत माहिती घेतली.
Read More २१ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण
निलंगा तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करीत विचारपूसही केली. यावेळी निलंगा उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव,गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, वैद्यकीय अधिक्षक डॉ़दिलीप सौंदाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, संतोषप्पा मुक्ता आदीसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.