23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रमतदानाला सुरुवात; आवाजी मतदानाऐवजी मत विभाजन

मतदानाला सुरुवात; आवाजी मतदानाऐवजी मत विभाजन

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. यासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर रिंगणात असून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटात खटके उडण्याची शक्यता आहे.

राहुल नार्वेकरांना बहुमत

राहुल नार्वेकर यांना आतापर्यंत १४५ पेक्षा जास्त सदस्यांचे मतदान झाले असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. बहुजन विकास आघाडी, मनसेने राहुल नार्वेकरांना मतदान केले आहे. भाजपा उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ सदस्यांचे मतदान झाले आहे.

राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव दिला असून त्याला गिरीश महाजनांनी अनुमोदन दिले आहे. तर चेतन तुपेंनी राजन साळवींचा प्रस्ताव दिला आहे. संग्राम थोपटेंनी त्याला अनुमोदन दिले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी उभे राहून मोजणी करण्याला विरोध केला आहे. त्यामुळे आता पोल घेतला जाणार आहे.

राहुल नार्वेकरांचा प्रस्ताव सध्या पुढे आहे. त्यासाठी ज्यांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करायचे आहे त्यांनी उजव्या बाजूला बसावे आणि विरोधात मतदान करायचे त्यांना डाव्या बाजूला बसण्यास सांगण्यात आले आहे. सध्या यासाठी वेळ दिलेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या