25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयराष्ट्रपती निवडणुकीचे मतदान सुरू

राष्ट्रपती निवडणुकीचे मतदान सुरू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: पंधराव्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संसद भवन संकुलात तर योगी आदित्यनाथ यांनी लखनौ विधानसभेत मतदान केले.

दुसरीकडे, बिहारमधील सीतामढीचे आमदार मिथिलेश कुमार मतदान करण्यासाठी स्ट्रेचरवर पोहोचले.
देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरू आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत.२१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

बंगालमध्ये क्रॉस व्होटिंग होऊ नये म्हणून भाजपने आधी आमदारांना कोलकात्यातील हॉटेलमध्ये ठेवले, नंतर सर्वांना विधानसभेत आणून मतदान केले. क्रॉस व्होटिंग रोखण्याची जबाबदारी पक्षाने शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा आणि स्वपन मजुमदार यांच्यावर सोपवली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मतदान केले.
खासदारांना मतदानासाठी हिरव्या रंगाच्या मतपत्रिका दिल्या जात आहेत, तर आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका दिल्या जात आहेत. यामध्ये खासदार आणि आमदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागते.

मतदान करणा-या पैकी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील संसद भवन संकुलात मतदान केले.
तर बिहारमधील सीतामढीचे आमदार मिथिलेश कुमार विधानसभेत मतदान करण्यासाठी स्ट्रेचरवर पोहोचले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी विधानसभेत मतदान केले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय
२१ जून रोजी भाजपने मुर्मू यांना उमेदवार म्हणून नियुक्त केले होते, तेव्हा एनडीएच्या बाजूने ५,६३,८२५ किंवा ५२% मते होती. सिन्हा २४ विरोधी पक्षांसोबत असल्याने ४,८०,७४८ म्हणजेच ४४% मतांचा विचार केला जात होता. गेल्या २७ दिवसांत मुर्मू यांना निर्णायक आघाडी मिळाली, कारण अनेक गैर-एनडीए पक्षांनी पाठिंबा दिला. यामुळे मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या