21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रव्हीप झुगारून ३९ आमदारांचे मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली

व्हीप झुगारून ३९ आमदारांचे मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली

एकमत ऑनलाईन

मुंबई : व्हीप झुगारून ३९ आमदारांनी केलेले मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली असल्याचा घणाघात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील बंडाळी आणखी ठळकपणे दिसून आली. शिवसेनेच्या ३९ बंडखोरांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात मतदान केले.

शिवसेनेच्या ३९ आमदारांनी व्हीप झुगारून मतदान केले. त्यामुळे आपण (राहुल नार्वेकर) विधानसभेच्या अध्यक्षपदी किती काळ असाल याबाबत राज्यातील १३ कोटी जनतेला शंका आहे, असेही सुनील प्रभू यांनी म्हटले.

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवड पार पडली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. त्यानंतर नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी म्हटले की, विधानसभेच्या अध्यक्षपदी तरुण सदस्याची निवड झाली याचा आनंद वाटत आहे.

आपण कधीकाळी शिवसेनेत, नंतर राष्ट्रवादी गेलात. त्यानंतर भाजपात गेलात. मागील १५ दिवसांमध्ये सत्तांतराच्या वातावरणात राहुल नार्वेकर कायदा मंत्री होतील असे वाटले होते. नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात. ज्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले.

ज्यांच्याकडे कायदा मंत्री म्हणून पाहत होतो त्यांना विधानसभा अध्यक्ष व्हावे लागले असे प्रभू यांनी म्हटले. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस असतील असे वाटले होते. मात्र, आमचं दु:ख विसरून देवेंद्र यांचं दु:ख मित्र म्हणून मोठं वाटलं असल्याचेही प्रभू यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या