22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रकेतकीच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक

केतकीच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक

एकमत ऑनलाईन

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणा-या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता संत तुकाराम महाराज संस्थानने देखील केतकीवर गुन्हा दाखल करायची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे विश्वस्तांनी तसा तक्रारी अर्ज दिलाय. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात जी कविता फेसबुकवर पोस्ट केली, त्यात ‘तुका म्हणे’ असा उल्लेख करण्यात आलाय.‘तुका म्हणे’ या शब्दांचा उल्लेख करून, वादग्रस्त आणि विडंबनात्मक लेखन करण्यात आलंय.

‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून, महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे. तेव्हा कोणत्याच संताचा वापर अशा पद्धतीने केला गेला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळं पुढं अशी कोणीच चुक करू नये म्हणून केतकी चितळेवर गुन्हा दाखल करावा. असा तक्रारी अर्ज संत तुकाराम महाराज संस्थानने करत कायदेशीर कारवाईची मागणी केलीय आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या