23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeवॉर्नरचा ‘बाहुबली’ लूक होतोय हिट!

वॉर्नरचा ‘बाहुबली’ लूक होतोय हिट!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : क्रिकेटपासून दूर असलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा नव्या व्हीडीओमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. या नव्या व्हीडीओमध्ये वॉर्नर आता हिट फिल्म ‘बाहुबली’चा योद्धा म्हणून समोर आला आहे. त्याचा हा लूक पाहून टिकटॉकवरील त्याचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

Read More  आफ्रिदी १६ वर्षांचा ‘जोकर’

या नव्या व्हीडीओमध्ये तो आणि त्याची मुलगी दिसत आहे. वॉर्नरची मुलगी अमरेंद्र बाहुबलीचा जयघोष करत आहे. लॉकडाऊन काळात वॉर्नर टिकटॉकवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. कोरोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्यामुळे वॉर्नरसह अनेक खेळाडू आपल्या घरीच वेळ घालवत आहेत.

यापूर्वीच्या व्हीडीओमध्ये वॉर्नर अजब-गजब वर्कआऊट करत असल्याचे दिसून आला होता. व्हीडीओमध्ये तो हिरव्या रंगाचा सँडो आणि गुलाबी लालसर रंगाची पॅण्ट घालून व्हीडीओ करत आहे. हा व्हीडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या व्हीडीओलाही चाहत्यांनी पसंती दिली आहे. यापूर्वी, वॉर्नरने आपल्या मुलीसह ‘शीला की जवानी’ गाण्यावर ठेका धरला होता. त्यानंतर त्याचा ‘फॅमिली डान्स’चा व्हीडीओही हिट झाला होता.

View this post on Instagram

Guess the movie!! @sunrisershyd

A post shared by David Warner (@davidwarner31) on

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या