Sunday, September 24, 2023

इशारा : शाळा सुरू झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील

नवी दिल्ली : करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली असून शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका असा इशाराच दिला आहे. रॉयटर्नसे यासंबंधी वृत्त दिलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये असं म्हटलं आहे. तसंच शाळांना राजकारणात आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. एकदा करोना महामारीचा प्रभाव कमी झाला की सुरक्षितपणे शाळा सुरु केल्या जाव्यात असं त्यांनी सांगितलं आहे. माइक रायन यांनी यावेळी अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाउन केला जावा असा सल्ला दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल.

Read More  ‘हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणत्यात’ जंगजौहर चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या