24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeतंत्रज्ञानसावधानतेचा इशारा : व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगद्वारे वाढले ब्लॅकमेलिंगचे प्रमाण

सावधानतेचा इशारा : व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगद्वारे वाढले ब्लॅकमेलिंगचे प्रमाण

एकमत ऑनलाईन

मुंबई (प्रतिनिधी) : सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणा-या राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणा-या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक करुन त्याद्वारे युर्जसकडून खंडणी मागण्याचा नवा धंदा हॅकर्सने सुरू केल्याचे सायबर सेलने नागरिकांना सुचित केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युर्जसच्या अकाउंटचा अँक्सेस मिळाल्यानंतर सायबर क्रूक्स (ऑनलाइन चोरटे) त्याला किंवा तिला त्यांचे आक्षेपार्ह फोटो पाठवून ते त्यांच्या कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपमध्ये पाठवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करीत आहेत. सायबर सेलने म्हटले की, अशा प्रकारे अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये हॅकर पीडित युर्जसचे आक्षेपार्ह फोटो तो किंवा ती सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये टाकतात. त्यानंतर ते पीडिताच्या कॉन्टॅक्ट्सद्वारे त्याचे अकाउंट हॅक करुन त्याच्याकडे पैशांची मागणी करतात.

जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप युजर आपला मोबाईल फोन बदलतात. तेव्हा त्यांनी याची खात्री करायला हवी की त्यांचा नवा फोन हा त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक झालेला आहे. हे लिंकेज व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोडद्वारे करता येते. मात्र, हे करताना हॅकरला युर्जसचा मोबाईल क्रमांक माहिती असतो. त्यामुळे, जर युजरने नकळत आपला व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोड कोणाशीही शेअर केला तर हॅकरला युर्जसच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळतो आणि अशा प्रकारे युजरचे अकाउंट हॅक होते. त्यानंतर हॅकरला पीडिताच्या सर्व संपर्क क्रमांकांचा तसेच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा ताबा मिळतो. त्यानंतर गुन्ह्यांची ही मालिका सुरू होते.

समजा तर पीडित युजरच्या संपर्क क्रमांकामधील सर्वाधिक संपर्क असलेला एखादा क्रमांक असेल तर हॅकर हे ताडतात आणि पीडित युजरला त्या सर्वाधिक संपर्क होणा-या क्रमांकावरुन व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोड त्याच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे सांगतात.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या