नवी दिल्ली: वृत्तसंस्था
राजस्थानात आज रविवारी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले आहे. केवळ राजस्थानच नव्हे तर पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगड येथेही तीव्र उन्हामुळे उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. येत्या ४ ते ५ दिवसांपर्यंत राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे, किनारपट्टीचा प्रदेश असलेल्या आंध्र प्रदेशसह, यनम आणि तेलंगणामध्येही पुढील तीन दिवस उष्णता असेल. तसेच मराठवाडा आणि रायलसीमा येथे पुढील २ दिवस तीव्र उष्णता असेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ईशान्येकडील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २६ ते २८ मे दरम्यान दक्षिण द्वीपकल्पातील तापमानातही घट दिसून येणार आहे.
Read More अमेरिकेहून परतलेल्या ७३ पैकी २१ जणांना कोरोना
हवामान विभागाचे प्रादेशिक अंदाज केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिमेडून येणारे उष्ण वारे आणि त्यानंतर पूर्वेकडून येणाºया वाºयांमुळे २८ मे या दिवशी तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे, असे आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले. दिल्ली-एनसीआरमध्ये २९-३० मे रोजी ताशी ६० किमी वेगाने धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.