22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात मुसळधार पावसाचा इशारा ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांत दडी मारलेल्या पावसाने या महिन्यात चांगलीच हजेरी लावली. राज्यासह देशभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणची धरणे दुथडी भरून वाहू लागली आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्याचबरोबर मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मच्छिमारांनाही पुढील २ दिवसांत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह पुणे, पश्चिम महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मराठवाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ओडिशा, पश्चिम बंगालमध्येही ऑरेंज अलर्ट जारी
देशभरात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. देशात अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ओडिशातील हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर परिस्थितीचा सामना करण्यासाठीची सर्व तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

त्याचबरोबर हवामान खात्याकडून मच्छिमारांना उत्तर-पश्चिम आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरापासून आणि आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून समुद्रात जाऊ नका असे आवाहन केले आहे. सद्यपरिस्थितीत सुरू असणा-या पावसामुळे समुद्राची स्थिती खराब राहण्याची शक्यता आहे. ओडिशामधील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या