लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एकाच दिवशी १० कोविड- १९ रुग्ण वाढले आहेत, ही चिंताजनक बाब आहे, हे सर्व रुग्ण आंतरजिल्हा आणि आंतरराज्यातून आलेले आहेत. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यांची वेळीच तपासणी झाली असून त्यांच्यापासून इतरांमध्ये प्रसार होण्याचा धोका टळला आहे़ सदरील बाब लक्षात घेऊन प्रशासन, पोलिस आणि जनतेने सतर्क राहून बाहेरून येणाºया नागरिकावर लक्ष ठेवावे, याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
Read More लातूर शहरात मुंबईहून आलेले २ रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह तर जिल्ह्यात ४ वाढले
यासंदर्भात बोलताना पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे की, परवा उदगीर तालुक्यातील बोरतळ तांडा येथे मुंबई (धारावी) येथून १० तर हैदराबाद येथून १ नागरिक आला होता. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने सजगता दाखवत त्या सर्वांना विलगीकरनात ठेवले व या सर्वांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवले होते. काल या सर्वांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. मुंबई येथून आलेल्या दहा पैकी ९ तर हैदराबाद येथून आलेला १ जण असे एकूण १० जण कोंिवड १९ पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उदगीर येथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. बोरतळ तांडा येथील नागरिक आणि प्रशासन यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हे रुग्ण सापडले असून त्यांच्यापासून पुढे होणारा प्रादुर्भाव टळला आहे.
Read More लातूर शहरात मुंबईहून आलेले २ रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह तर जिल्ह्यात ४ वाढले
एकंदरीत सध्या आंतरजिल्हा आणि आंतरराज्यातून बरेच लोक लातूर जिल्ह्यात येत आहेत काही लोक तपासणी करून आणि रितसर परवानगी घेऊन येत आहेत त्यांच्यापासून धोका नाही, मात्र काही लोक परस्परही येत आहेत. परस्पर येणाºया या लोकांपासून जिल्ह्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे अशा नागरिकावर स्थानिक शहरी तसेच ग्रामीण लोक, प्रशासन आणि पोलिस या सर्वांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. काही ठिकाणी असे परस्पर लोक आले असतील तर त्याची माहिती जनतेकडून प्रशासनाला ताबडतोब देणे गरजेचे आहे, असे घडले तर आपणाला आपल्या जिल्ह्यात कोविड१९ चा प्रादुर्भाव रोखता येणार आहे. कोविड१९ चा प्रादुर्भाव रोखणे ही सर्वच समाज घटकांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी दक्ष राहून या बाबतीत काळजी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.